हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ४ जून, २०२०

विसावा


दृश्य बाह्य शुद्ध सत्व
सुप्त गुप्त अंतरंग
चेहरे अभेद्य सर्व
सूत्रही जणू अभंग

भीतीची बहुरूपी माया ही
जखडे ती मन तसेच कायाही

स्वप्न वाढता मनात
वेड लागते विचित्र
स्वस्थता विरून रोज
मोहबद्ध गात्र गात्र

धडपडती तगमगती क्षणोक्षणी
जणू सर्व जोखडात रणांगणी

... अन् तटस्थ शेवटास
येतसे समीप अंत
वेदना अनंत मात्र
भासताच विश्व शांत

... संज्ञा विझती विरती धूम्रतेत
विसावते वादळही शांततेत


- निलेश पंडित
५ जून २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा