कधी जगाच्या
रखरखणा-या
रोजरहाटी
निवडुंगासम
टोचक बोचक
खोचक भोचक
अनुभूतिंनी
भाजुन येतो
कधि मोदाच्या
लहरीं मध्ये
यश थेम्बांनी
भिजून येतो
कधी उन्हातुन
शुष्क कपाळी
असंख्य आठ्या
त्रस्तपणाच्या
पिंजुन येतो
समजुन येतो
भंजुन येतो
रंजुन येतो
गंजुन येतो
मातुन येतो
माजुन येतो
गर्जुन येतो
गाजुन येतो
कधी भितीने
ग्रासुन भेकड
थरथर कापत
मृत्त्युभयाने
झिजून येतो
परी जेधवा
दिवसाखेरी
तुझ्या स्मिताने
अखेर निवते
सर्वांगाची
आणि मनाची
लाही लाही
दिवसाखेरी
अवचित गवसे
संसारातिल...
...सर्वार्थाने...
सगळे काही...
....सगळे काही...
- निलेश पंडित
सप्टेंबर २००४
यांत्रिक दिनचर्या आणि त्यात चिपाडहोत असलेला माणूस दिसू लागतो हे वाचताना... मात्र आपल्या घरात मिळणारी प्रसन्न शांती पुन्हा एकदा उत्साह देते... छान रचना
उत्तर द्याहटवामनापासून आभार श्रीधरजी.
उत्तर द्याहटवा