हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २० जुलै, २०१२

तडे

एक होता काळ जेव्हा तोडुनी मज फेकले
मायबापा सांग येथे तेच का मग भेटले?

लाज-या ओठांत त्यांच्या फक्त होती शांतता
आज आमच्या काढती का दोष ते भाषेतले?

टाळुनी लोकांस आम्ही भेटलो होतो कधी
आज त्यांचे मित्र झाले लोक ते वाटेतले!

खोडुनी आरोप सारे नाव त्यांचे राखले
आज ते आरोप सारे आमच्यावर शेकले!

पुन्हा सारे स्थिरावेल नि तोल सारा सावरू
लोकहो लपवू कसे मी हे तडे काचेतले?

- निलेश पंडित
२० जुलै २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा