अधिकाराच्या जागेवरती बसून माकड खुशीत हसले
आम्हा अनुयायांना त्याचे पुच्छच दिसले !
मर्कटरावांच्या हास्यावर सुजाण सारे खूप भाळले
स्तुतिसुमनांचा पाउस त्यांवर पाडित बसले !
आम्ही झालो चकित जरा अन् अधोगतीने व्यथितही झालो
"..सूज्ञ म्हणविती...त्यांचे हे चाळे का असले ?"
अखेर घेउन अनुभव आता स्वरुप जाणले जनसत्तेचे -
...पुच्छ नसे पण...माकडेच ही मानव कसले !
- निलेश पंडित
२७ जुलै २०१२
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा