हा ब्लॉग शोधा

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१२

वाटा


वाटा विषारी, तुडवीत गेलो
चव पीयुषाची, रुजवीत गेलो

मारावयाला आले मला जे
मैत्री तयांशी जडवीत गेलो

प्याले दुधाचे नासून जाता
खाशी मिठाई बनवीत गेलो

धिक्कारले तू अन् टाळले ही
मूर्ती तुझी पण घडवीत गेलो

शब्दांत आता शक्तीच नाही
कवितेत त्रागा लपवीत गेलो

- निलेश पंडित
४ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा