माणसांसारखी माणसं पण
नवं मन
प्रत्येक देही
नावानावात साम्य तरी
प्रत्येक नावी नवीन सही
दिवसांसारखे दिवस
आणि रात्र रात्र पुन्हा पुन्हा
कुशीही त्या
अन् झोपही ती पण
नवीन स्वप्ने...नवीन खुणा
पेला तोच नि पेय ही ते...
स्वादही तो पण नवी नशा!
नागमोडी अन्
विचित्र रस्ता
वळणा वळणा नवी दिशा
तेच मला...
जे जुने परंतु
अनुभव देते नित्य नवा
ओबड धोबड
अशा मितींच्या
आयुष्याचा लाभ हवा...!
- निलेश पंडित
२३ ऑगस्ट २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा