हा ब्लॉग शोधा

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

प्रश्न


रोजच माझ्या न्याय मंदिरी सुप्त मनाच्या
कितेक सारे...कुणी ति-हाइत - कुणी आपले...
खेचुन आणुन आढावा मी घेतो त्यांच्या
सुप्त मनांचा

तळमळती अन् तडफडती...मग क्रुद्ध हि होती
हीन तसे उन्मत्त भासती...जणू श्वापदे
दिवसा ढवळ्या रक्त शोषुनी अंत पाहती
सुष्ट जनांचा

अखेर होतो अधीन हलके मी निद्रेच्या...
सुखावुनी मग निवांत निजती सारी गात्रे
आठव नुरतो दिवसा मधल्या क्षणाक्षणाचा
घोर रणाच्या

कधी कधी पण अंतर्मुख मी अवचित होतो
प्रश्न दाटतो मनात माझ्या खोल तळाशी,
"सुप्त मनाच्या न्याय मंदिरी....मी ही जातो....
कुणाकुणाच्या?"

- निलेश पंडित
२१ सप्टेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा