मी छोटा झालो तेव्हा
जग विशाल मजला दिसले
पळभरात सारे माझे
हे जीवनफळ रसरसले
मम न्यूनत्वाचि प्रचीती
हा अनुभव होता मोठा
मम पार्थिवतेतच होता
तो दिव्यत्वाचा साठा
मी शांत होउनी जेव्हा
ऐकला जगाचा नाद
गवसली तयातच मजला
मम मनःशांतीची साद
उघडून पाहिले डोळे
जग दिसले सुंदर भवती
कुरुपता मनाची आधी
मज बंधन घालित होती
या जगात या हो मिथ्या
तव मंदिरातुनी देवा
ऐहीक श्रमातच लाभे
सुख सौंदर्याचा ठेवा !
- २६ नोव्हेंबर २०१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा