हा ब्लॉग शोधा

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

दोघी

स्त्रियाच दोघी
दिशा एक अन
मार्ग समांतर
गती सारखी
चाल सारखी
प्रवास खडतर

ऊंच इमारत
हिला लाभते
कोंदट न्हाणी
तिला लाभते
संभावित कुणि
हिला न्याहाळी
तिला छेडती
गुंड मवाली

ही वापरते
जीव रमविण्या
ऊंची वस्त्रे
मोहक वस्तू
घाम लपविण्या
अत्तर उंची
घाम टिपे ती
पदराने अन
डाव्या हाती
तंबाखूची
सदैव ठेवे
भरली चंची

आपापल्या
कुवतीत राबुनी
सदैव दबुनी
निसर्गतेच्या
ओझ्याखाली
कुटुंबतेच्या
वात्सल्याच्या
भरून देती
मुला माणसां
लक्ष पखाली

- निलेश पंडित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा