हा ब्लॉग शोधा

सोमवार, २१ जानेवारी, २०१३

धाप


उंच मनोरे, सुंदर रस्ते
गर्द तरुंची दाटी वाटी
लोभविणा-या हिरवाइतही
का आठवते झोपडपट्टी ?

धक्का संपुन, पुढे फुटावी
वाट सुखाची...ती फुटतेही
मनी तरीही अस्थिरतेची
अखंड भीती दाटुन राही

काळ वाजवी मऊ मनावर
गतकालाच्या योगांचे घण...
नुरे वेदना...कसे पुसावे
तरी...कुरुपशा घावांचे व्रण?

"याच क्षणावर जगत रहावे"...
...स्तुत्य कल्पना...उदात्त खाशी...
श्वास मोकळा झाल्यावरही
धाप लावते स्मृती जराशी !!

- निलेश पंडित
२४ जून २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा