हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ जानेवारी, २०१३

संस्कृती


पूर्वजांची स्फूर्ति देणारी स्मृती माझी नव्हे का?
हे खरे तर त्या पिढ्यांची विकृती माझी नव्हे का?

रामकृष्णांच्या कथा गाव्या जरी गर्वात आम्ही
कंस अन दुःशासनाची दुष्कृती माझी नव्हे का?

गंध माझा, फूल माझे, बाग माझी...गर्जतो मी
फक्त काटे विसरण्याची विस्मृती माझी नव्हे का?

लेख लिहितो, भाषणेही ठोकतो जोशात मोठी
षंढतेतच नांदणारी प्रकृती माझी नव्हे का?

रोज येथे घोष करणे, रोषणाई अन पताका
निर्भयाला मारणारी संस्कृती माझी नव्हे का?

- निलेश पंडित
१९ डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा