हा ब्लॉग शोधा

सोमवार, २८ जानेवारी, २०१३

तिरीप


धूसर होते सर्व शांतता
सवय करी दुःखाला अळणी
मचूळ होते जगणे सारे
रात्र बने दिवसाची गुळणी

काळे ढग सूर्यास दडवती
मलूल पाउस करतो फसगत
अश्रू दडती हास्यामागे
नवलाईची नुरते रंगते

खाटेवरती याच कुठुनशी
परंतु तेव्हा तिरीप येते
धूळ नाचते झोतातच पण
प्रकाश आणिक ऊब आणते

भरून घेता दीर्घ श्वास मी
आत जातसे धूळ त्यातली
जीवनसत्वे...जीवनतत्वे
त्यातच मिळती प्रकाशातली

- निलेश पंडित
११ डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा