हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३० जानेवारी, २०१३

सोन्याचे क्षण


कास जरा शब्दांची आपण धरून जाऊ
निःशब्दाला शब्दांमध्ये भरून जाऊ

विजयासाठी भले भले भांडतात येथे
मला हवे ते ओळख...आपण हरून जाऊ!

किती पहावी बुडणा-यांची 'असली' दुनिया?
पहात राहू स्वप्ने आणिक तरून जाऊ !

जगण्यासाठी पितात दारू अनेक येथे
आपण दोघे नशा विषाची करून जाऊ

आठवणीतच राहू आपण उद्या जगाच्या
जगू जरा सोन्याचे क्षण अन् मरून जाऊ !

- निलेश पंडित
३१ जानेवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा