हा ब्लॉग शोधा

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

आहे आहे


भयाण स्वप्ने पडतात...पडोत
नंतर थोडी जाग तर आहे !
बसतात चटके...(बसणारच ते...)
शिजवण्या थोडी आग तर आहे !

डोंगर द-यांतून...काट्याकुट्या तून
थिजत थबकत...पण आहे गती?
घडतात गुन्हे नि होतो ताप
पण आहे ना नंतर उपरती?

जातो तोल नि पडते भूल
बेताल वर्तनात होते नशा
सावरण्याचे येतात दिवस
संपतात कुरूप रात्रीही अशा !

"नाही नाही" चा कंठशोष
आपल्या पाचवीला पुजलेला ...
"आहे आहे" चा क्षीणसा रव
त्यातच असतो ना सजलेला?


- निलेश पंडित
२५ सप्टेंबर २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा