हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१३

मराठी कविता समूह


विचार, व्यक्ती आणि मनांचा
सर्व दिशांनी प्रवाह वाहे
समविचार अन मतभेदांचा
समूह अपुला समुद्र आहे

अनोळखी या वाटेवरती
अनोळखी जरि आपण सारे
वाटेवरती फिरत राहता
एकत्वाने समरसणारे

भले असू दे पसा रिकामा
भूक थोर मज गती देतसे
अंधाराच्या जगती सा-या
शब्दांचे मिळतात कवडसे

अर्थाला शब्दांची आता
गरज भासते परंतु थोडी
शब्दांवरती मूकपणाची
अवचित नकळत चढते गोडी

सृजनाची सृजनाशी येथे
गाठ पडावी निर्मित काही
या परते मज पाशी आता
स्वप्न असे ते उरले नाही !

- निलेश पंडित
२३ फेब्रुवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा