हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १ मार्च, २०१३

वेड


जाड्या भरड्या गळ्यात माझ्या सूर तासतो बारा
तीनच रंगांमधुनी जन्मे रंगांचा पट न्यारा

अक्षर शिल्पातून शब्द अन काव्य तयांतुन झाले
नैसर्गिक तंतूतुन विणले गर्भरेशमी शेले

मध्यम वर्गीयाच्या केवळ नका रुपावर जाऊ
दैनंदिन जगण्यातच केवळ नका माणसा पाहू

भले जन्मली मुळे नि रुजली मातीमध्ये सारी
हरेक पाना फुलास लागे वेड नभाचे भारी

सामान्यत्वातूनच माझ्या असामान्य मी होतो
रांधत, वाढत...उष्टी काढत...सुखही वेचित जातो

- निलेश पंडित
१ मार्च २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा