हा ब्लॉग शोधा

सोमवार, १८ मार्च, २०१३

युक्ती

केवळ अवखळ खळखळ कोठे
कोठे घनगंभीर जलाशय
अर्थहीन शब्दांची माया
कोठे...कोठे उदात्त आशय

कधी दिसे रक्ताचा नाला

कधी दुधाचा वत्सल सागर
असत्य नटते आणि मिरवते
सत्य सूक्ष्म
अन् नग्न अनागर

ओघळती...वाहती आसवे

अधेमधे हास्यही लाभते
अवचित मिळतो त्यातच सल्ला
यश...विद्या...विनयेन शोभते

विविध प्रवाहांच्या मध्यावर

लटपटतो अन बावरतो मी
कालप्रवाही लपण्याची मग
हळूच करतो युक्ती नामी


- निलेश पंडित

२६ जानेवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा