हा ब्लॉग शोधा

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

उःशाप

(वृत्त मनोरमा)

आवरू दे व्याप आता
दे जरा उःशाप आता

कैक वर्षे हेच जगलो
का असा थरकाप आता?

शर्यती संपून साऱ्या
फक्त लागे धाप आता

सूर ताला वीण गाऊ
कोणता आलाप आता?

कार्य झाले शून्य येथे
शब्द वारेमाप आता

घोर पापांवर तुझी का
हाय ... देवा ... छाप आता?

"पंडिता" घ्या काळजी अन
आवरा संताप आता


- निलेश पंडित
२२ सप्टेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा