हा ब्लॉग शोधा

रविवार, २२ डिसेंबर, २०१३

वर्षाव

(वृत्त: मंजुघोषा)

वाटले जो जीवघेणा घाव होता
आठवांचा तो तुझ्या वर्षाव होता

तर्क झाला सज्ज तुजला टाळण्याला
मात्र तर्काला मनी मज्जाव होता

बहरणे, जगणे तुझे ताने प्रमाणे
आणि माझ्या जीवनी ठहराव होता

तू निरोपाचे जरी हसलीस तेव्हा
'शांतते'ने कळविले तो आव होता

रोखुनी मी आसवे हसलो जरासा
खोल पण हृदयात रक्तस्त्राव होता


- निलेश पंडित
२१ डिसेंबर २०१३

२ टिप्पण्या: