(वृत्त: वनहरिणी)
सर्व दिशांचा एकच गुंता - चक्रगतीने भिरभिरतो मी
तात्पुरता मग मार्ग काढुनी लखलख जगती वावरतो मी
दोन निशेचे दोन नशेचे घोट पिताना मोहरतो मी
निद्रेमध्ये विलीन होतो - रात्र टाळतो अवघड काळी
डोळे चोळत बघता दिसते… "पुढे काय …" ची पुढे पोकळी
चोखाळत जातो मग काही मार्ग निराळे वेगवेगळे
भक्ती, जप अन ध्यानधारणा, जादू टोणे गंडे काळे
फरफट होते, थकून जातो करून बघतो उपाय सगळे
चक्रव्यूह जाचतो जाळतो क्षणाक्षणाला सांजसकाळी
पुन्हा एकदा उभी ठाकते "पुढे काय … " ची पुढे पोकळी
अशी काढुनी कितेक वर्षे वाढत गेली अंतर्मुखता
अंतर्मुखतेतून जन्मली पोकळीतही अर्थपूर्णता
जरी पोकळी पूर्ण भरेना, अर्थपूर्णता वाढे आता
तकलादू "जेव्हां तेव्हां' च्या संदर्भांची होते होळी
लयास जाताना दिसते मज "पुढे काय … " ची पुढे पोकळी
- निलेश पंडित
२० डिसेंबर २०१३

मनापासून आभार वर्षा :-)
उत्तर द्याहटवा