हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २८ जानेवारी, २०१४

संन्यास

(वृत्त: मंजुघोषा)

आठवांच्या मी तुझ्या समवेत आता
जीव अर्धा राहिलेले प्रेत आता

घेउनी गेलीस तू मंझील माझी
काय माझे राहिले यात्रेत आता

संपली यादी तुझ्या माझ्या क्षणांची
मांडतो मी शांतता गझलेत आता

बहर सारे कोळुनी प्यालो जरी मी
अनुभवाला वाव ना प्रतिभेत आता

घेतला संन्यास मी हे नवल कसले
तूच ना उरलीस जर मायेत आता

- निलेश पंडित
२९ जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा