अदृश्य भिंत
अखेर गवसली
वर्षानुवर्षे
हुलकावणी
देत बसलेली
हिमालयाहून उंच
सूक्ष्म प्रत्यक्षात
तृणाहूनही
मात्र भासणारी
अशक्यप्राय
लंघून जाण्यास
गर्दीत हरवून
अडकून पडल्यास
होतो अलिकडे
पडलेला अडकून
गर्दीकडून एकटेपणाकडे
परतूनही
मनात गर्दी जपून
आहे आता पलिकडे
शांत एकटेपण जपून
भर गर्दीतही
मिळून मिसळून
- निलेश पंडित
२४ जानेवारी २०१४
अखेर गवसली
वर्षानुवर्षे
हुलकावणी
देत बसलेली
हिमालयाहून उंच
सूक्ष्म प्रत्यक्षात
तृणाहूनही
मात्र भासणारी
अशक्यप्राय
लंघून जाण्यास
गर्दीत हरवून
अडकून पडल्यास
होतो अलिकडे
पडलेला अडकून
गर्दीकडून एकटेपणाकडे
परतूनही
मनात गर्दी जपून
आहे आता पलिकडे
शांत एकटेपण जपून
भर गर्दीतही
मिळून मिसळून
- निलेश पंडित
२४ जानेवारी २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा