हा ब्लॉग शोधा

सोमवार, ६ जानेवारी, २०१४

जहर

थेंबाथेंबाने ओघळणारा
आयुष्याचा प्रत्येक क्षण
समरसतेतून
कृतिशीलतेतून
अथक परिश्रमांनी जरी
चाखण्याचा
प्रयत्न केला मी
तरी जेव्हां
माझ्या आवाक्यात
आणणारा प्रत्येक जण
घेऊन आला तो
माझ्या जिभेवर
तेव्हां देऊन गेला
स्वाद कडसर

माझ्या आणि त्या सर्वांच्या
अश्रूंनी
चपापून शेवटी
क्षण दोन क्षण
जेव्हां थांबवलं ते
अविश्रांत चाललेलं चर्वण
तेव्हां सूक्ष्म वेदना
आणि जाणीव प्रखर
देऊन गेलं
माझ्याच जिव्हेतील
हजारो ग्रंथींमध्ये
युगानुयुगे साचलेलं
मध्यमवर्गीय पांढरपेशा
कडू जहर


- निलेश पंडित
७ जानेवारी २०१४

२ टिप्पण्या: