(वृत्त: उद्धव)
ह्या निसर्गतेच्या उदरी
सुख अनपेक्षित मिळणारे
माझ्याच अंगणामधल्या
ह्या तरारणाऱ्या वेली
तो डोंगर दूर नभीचा
ते भगवे स्वप्न उषेचे
अन् तशीच संध्यारेषा
फुलवीत दिशांना दाही
हे सहज जरी उमगे ना
हे इथेच संपत नाही
ही विज्ञानाची किमया
प्रगतीच्या असंख्य वाटा
वाटांवर मोहक स्वप्ने
काही स्वप्नांची पूर्ती
उरलेली तशीच बघणे
त्या स्वप्नांसाठी हिंसा
तेजाला काळी छाया
मृत्यूत वसे जीवनही
"क्षणभंगूर"च जे काही
ते तिथेच संपत नाही
दोहोंच्या केंद्राशी मी
हृदयात आत बघताना
विज्ञान आत रुजताना
अन् निसर्गास भजताना
पावलांस मिळते ऊर्जा
मेंदूस चेतना गवसे
वृत्तीत विसावा विलसे
संज्ञांची विरते लाही
संवेग देतसे ग्वाही
"हे इथेच संपत नाही"
- निलेश पंडित
१२ जानेवारी २०१४
ह्या निसर्गतेच्या उदरी
सुख अनपेक्षित मिळणारे
माझ्याच अंगणामधल्या
ह्या तरारणाऱ्या वेली
तो डोंगर दूर नभीचा
ते भगवे स्वप्न उषेचे
अन् तशीच संध्यारेषा
फुलवीत दिशांना दाही
हे सहज जरी उमगे ना
हे इथेच संपत नाही
ही विज्ञानाची किमया
प्रगतीच्या असंख्य वाटा
वाटांवर मोहक स्वप्ने
काही स्वप्नांची पूर्ती
उरलेली तशीच बघणे
त्या स्वप्नांसाठी हिंसा
तेजाला काळी छाया
मृत्यूत वसे जीवनही
"क्षणभंगूर"च जे काही
ते तिथेच संपत नाही
दोहोंच्या केंद्राशी मी
हृदयात आत बघताना
विज्ञान आत रुजताना
अन् निसर्गास भजताना
पावलांस मिळते ऊर्जा
मेंदूस चेतना गवसे
वृत्तीत विसावा विलसे
संज्ञांची विरते लाही
संवेग देतसे ग्वाही
"हे इथेच संपत नाही"
- निलेश पंडित
१२ जानेवारी २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा