एकेकाळी ज्याचा धूर निघे (म्हणतात)
ते वाडवडिलार्जित (!) सोनं
भाषा, शब्दा - सुरांचा (म्हणे)
अभिमानास्पद ठेवा
पवन आणि पर्जन्य सुद्धा
कह्यात ठेवणारी (म्हणे)
सूक्तं
त्यांतून कसण्याच्या
काळ्याशार शेतजमिनी
चौसोपी वाडे
आणि या सर्वांना
सावली देणारा
तथाकथित संस्कृतीचा वृक्ष
ज्याने नेहमीच
पाना - फुला - फळांत
शतकानुशतकं
दिलं माप झुकतं
त्याचा वारसा
वाटतो हवाहवासा
तुम्ही सुखनिद्रेत असताना
त्या वृक्षाची मुळं
ज्या झोपड्यांत
रात्री अपरात्री
आली बाहेर
आमची झोप
पिढ्यान् पिढ्या
उडवीत
त्या झोपड्यांना
झावळ्यांची छपरं
आणि चार वीत जागा
परत देताना
का … का हा त्रागा?
- निलेश पंडित
१० फेब्रुवारी २०१४
ते वाडवडिलार्जित (!) सोनं
भाषा, शब्दा - सुरांचा (म्हणे)
अभिमानास्पद ठेवा
पवन आणि पर्जन्य सुद्धा
कह्यात ठेवणारी (म्हणे)
सूक्तं
त्यांतून कसण्याच्या
काळ्याशार शेतजमिनी
चौसोपी वाडे
आणि या सर्वांना
सावली देणारा
तथाकथित संस्कृतीचा वृक्ष
ज्याने नेहमीच
पाना - फुला - फळांत
शतकानुशतकं
दिलं माप झुकतं
त्याचा वारसा
वाटतो हवाहवासा
तुम्ही सुखनिद्रेत असताना
त्या वृक्षाची मुळं
ज्या झोपड्यांत
रात्री अपरात्री
आली बाहेर
आमची झोप
पिढ्यान् पिढ्या
उडवीत
त्या झोपड्यांना
झावळ्यांची छपरं
आणि चार वीत जागा
परत देताना
का … का हा त्रागा?
- निलेश पंडित
१० फेब्रुवारी २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा