हा ब्लॉग शोधा

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०१४

कुंपण

(वृत्त: हरिभगिनी)

प्रकाशवाटेला ही अंधाराचे कुंपण लाभावे
मिळता उत्तर एखादे मी सहस्त्र संशय मागावे

बर्फाचे वाफेचे अनुभव जरूर घ्यावे द्यावेही
दुर्मिळ क्षण भोगावे थोडेथोडेसे निसटावेही

डोळ्यांमधला अश्रू गालावरल्या खळीत साठावा
सायंकाळी क्षितिजावरती रंग उषेचा दाटावा

प्रायोगिक हा प्रवास ज्याला नाविन्याची जोड असे
क्षणोक्षणी प्रश्नांची माला कधी, कुठे अन् काय - कसे?

तुला, मला, जगताला माझ्या आतुन मी साकारावे
संशय फिटता नवीन मिळता पुन्हा पुन्हा नाकारावे!


- निलेश पंडित
१६ फेब्रुवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा