(साहिर लुधियानवी यांच्या 'हम दोनो' या चित्रपटातील 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' या गीताचा स्वैर भावानुवाद)
(वृत्त: भवानी)
हातात घेतला हात तुला मी साथ दिली आयुष्या
विरली नशेत चिंता हरेक तुज मात दिली आयुष्या
वाताहतीस मी व्यर्थ भीत जावे कशास जगताना
वाताहतीस जागा सदैव हृदयात दिली आयुष्या
पोकळी सर्व विस्मृतीत सारत गेलो आनंदाने
लाभली सुखे कोंदणे त्यांस स्मरणात दिली आयुष्या
सुखदुःख यांत ना फरक पडावा मनास माझ्या ऐसी
जगण्यास स्थिती मी जगताना डौलात दिली आयुष्या
ना सोयर असण्याचे आता ना सुतक मला नसण्याचे
मी मृत्यूलाही साद अशी कैफात दिली आयुष्या
- निलेश पंडित
२ ऑगस्ट २०१४
मूळ रचना:
मैं जिन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुंएँ में उडाता चला गया
बरबादीयों का सोग़ मनाना फिजूल था
बरबादीयों का जश्न मनाता चला गया
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उस को भुलाता चला गया
गम और खुशी में फर्क ना महसूस हो जहा
मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया
गीतकार : साहिर लुधियानवी,
गायक : मोहम्मद रफी,
संगीतकार : जयदेव,
चित्रपट : हम दोनो - १९६१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा