हा ब्लॉग शोधा

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

लीला

(वृत्त: कालगंगा)

गुपित भक्तांच्या मनावरती ठसावे नेहमी
संशयाचे भूत मानेवर बसावे नेहमी

त्यागती बुद्धी नि जाती शरण जोडुन हात जे  
सर्व त्या मेंढ्यांमधे धनगर असावे नेहमी  

जिंकण्याचे सूत्र सोपे आज व्यवहारातले
आसरा ज्याचा मिळे त्याला डसावे नेहमी

रक्त, अश्रू, घाम सारे भक्त भोळे गाळती
भाग्य त्यांचे हेच स्वामींनी हसावे नेहमी

निर्जळा उपवास करता भक्त येथे शेकडो
सद्गुरूंनी दुग्ध प्राशुन रसरसावे नेहमी

काय ही लीला गुरूंची संकटे जे टाळती
ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी नसावे नेहमी


- निलेश पंडित
१५ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा