साडे तीन हजार वर्षे
किंवा थोडी अधिक
पण फास तोच
अडकलेला श्वास तोच
तसाच फसवा
वेगळा देश
पण तोच चकवा
कधी टॅव्हर्न कधी झोपडी
कधी जीन कधी खोपडी
कधी खारवलेलं शिळं पोर्क
व्हर्जिनियात
कधी कुठे वेशीबाहेर
उष्ट्यासाठीही यातायात
तेव्हाही अन् आजही
राजकारणात तेच बळी
लिंकनपासून गांधींपर्यंत
तीच नेमकी जातकुळी
किंग, डग्लस, वेल्स
फुले, आंबेडकर, शाहू
होतील बहु, झाले बहु
फक्त करार-प्रत्यक्षातली
तफावत
नका पाहू
सकाळ तिथे रात्र
दिव्याखाली अंधार
महाडच्या तळ्याचं पाणी
असो कितीही चवदार
- निलेश पंडित
१२ फेब्रुवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा