(वृत्त: धरित्री)
उरात स्वच्छ श्वास मोकळा भरावा
खरेच देश एकदा स्वतंत्र व्हावा
असे स्वतंत्र एरवी स्वदेश माझा
खराखुरा महानही कधी ठरावा
विमान, यान संस्कृती बरीच मोठी
रित्या मुखामुखात घासही पडावा
अनेक लोक देश रक्षणार्थ येथे
असाच जनहितार्थ देश का नसावा?
अपूर्व देश, धर्म, प्रांत आणि भाषा
अमूल्य फक्त नागरीकही असावा
- निलेश पंडित
१६ फेब्रुवारी २०१६
उरात स्वच्छ श्वास मोकळा भरावा
खरेच देश एकदा स्वतंत्र व्हावा
असे स्वतंत्र एरवी स्वदेश माझा
खराखुरा महानही कधी ठरावा
विमान, यान संस्कृती बरीच मोठी
रित्या मुखामुखात घासही पडावा
अनेक लोक देश रक्षणार्थ येथे
असाच जनहितार्थ देश का नसावा?
अपूर्व देश, धर्म, प्रांत आणि भाषा
अमूल्य फक्त नागरीकही असावा
- निलेश पंडित
१६ फेब्रुवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा