हा ब्लॉग शोधा

शनिवार, १६ जुलै, २०१६

तपास


"नवीनच कुणी आहे सुशिक्षित तरुणच
शिक्षण परप्रांतात घेऊन आली परत
बेफाम ज्वलंत काही रोज लिहिते बोलते
वणव्यासारखी तिची किर्ती आहे पसरत"

"स्वातंत्र्यसैनिकांच्या ती लोकांना सांगते कथा
जन्मसिद्ध हक्क माझा स्वराज्य आहे म्हणते
मिरविते झेंडे काही फलक नि पुस्तकेही
जनजागृतीसाठी ती सदैव वणवणते"

विचारात गढलेला साहेब अजुन शांत
शिपाई थांबला थोडा सारी माहिती देऊन
साहेबाला जाणवले त्याच्या आदर्शांचे बिंब
जबाबदारीने मात्र उद्गारला मागाहून

"काय म्हणेल आपले सत्ताधारी सरकार
- तपासू - मग ठरवू - सत्कार की ..................... !"


- निलेश पंडित
१६ जुलै २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा