हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

धिप्पाड

हासला बंदिस्त असता आज तो रडला कसा
लाभता स्वातंत्र्य आता देश अवघडला कसा

श्वापदांना वादळांना रोखले ज्याने कधी
उंदरांनी देह तो धिप्पाड कुरतडला कसा

दान देताना जगाला मुक्तहस्ताने दिले
आपल्या लोकांमधे मग हात आखडला कसा

कोरड्या वैराण जमिनींवर कशाला राहिला
बरसणे नसता नशीबी फक्त गडगडला कसा

येत होता धूर सोन्याचा म्हणे येथे कधी
माणसाचा चेहरा चिखलात लडबडला कसा

बारकाईने जगाला सांगतो साऱ्या त्रुटी
मग कृतीची वेळ येता हाच गडबडला कसा

- निलेश पंडित
१ आॅक्टोबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा