अंधार चिरत जाणारी किंकाळी
दाबली जाते उजेड होण्याआधी
रक्ताची चिळकांडीच काय
टिपूसही मोकळा होऊ नये
ह्याची दक्षता घेत असतो
भाडोत्री गुंडांनी
अहोरात्र गाळलेला घाम
तेव्हा लख्ख उजेडात
वेगळ्याच गोलार्धात
मी वाचत असतो
समाधानाने
कालचे
दिवसभरात उजळलेले आलेख
मला दिसणाऱ्या स्वदेशातले
स्वतःला स्वप्नांच्या चौकटीत बांधून
झोपवण्यासाठी शांतपणे
प्रगतीचा दाखला देत
अंतर्मनाला
उजेड आलेख श्वास दाखला
हे आभासच
(हो ... चौकटही)
चिरंतन शाश्वत सत्ये दोनच
रक्ताच्या चिळकांड्या
किंकाळ्या दबलेल्या
- निलेश पंडित
२५ नोव्हेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा