डोळ्यात दोन अश्रू ओठांत गोड भाषा
ह्यातून आज ठरते नेता कसा असावा
दिमतीस सज्ज काही असती जरी लुटारू
साधा सरळ ठरावा नेता तरी बिचारा
सरली कधीच पद्धत यश, कष्ट मोजण्याची
साऱ्याच वृत्तपत्रांमध्ये हवा दरारा
खोटे निकष खऱ्याचे बिनधास्त वापरावे
आशाळभूत जनता भुलते अशा खऱ्याला
वाटे हवाहवासा पर्याय कोणताही
पर्याय संपण्याचा मौका असा धरावा
फसण्यात फक्त ज्यांचा साराच जन्म गेला
त्यांना कसा कळावा अगदी नवाच कावा
- निलेश पंडित
१९ नोव्हेंबर २०१६
ह्यातून आज ठरते नेता कसा असावा
दिमतीस सज्ज काही असती जरी लुटारू
साधा सरळ ठरावा नेता तरी बिचारा
सरली कधीच पद्धत यश, कष्ट मोजण्याची
साऱ्याच वृत्तपत्रांमध्ये हवा दरारा
खोटे निकष खऱ्याचे बिनधास्त वापरावे
आशाळभूत जनता भुलते अशा खऱ्याला
वाटे हवाहवासा पर्याय कोणताही
पर्याय संपण्याचा मौका असा धरावा
फसण्यात फक्त ज्यांचा साराच जन्म गेला
त्यांना कसा कळावा अगदी नवाच कावा
- निलेश पंडित
१९ नोव्हेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा