(वृत्त: तोटक)
जळतात कुणी जगण्यात इथे
जगतात कुणी जळण्यात इथे
नर नम्र तसेच सुशिक्षितही
पण खोट दिसे बघण्यात इथे
घडते नव जीवन रोज कुठे
अभिमान जुने जपण्यात इथे
भरघोस कुणा यश लाभतसे
जनता अवघी फसण्यात इथे
हरतात किती मरतात किती
यश मात्र खरे तगण्यात इथे
सरतील पुढे क्षण शेवटचे
सगळेच जुने स्मरण्यात इथे
- निलेश पंडित
५ जानेवारी २०१८
जळतात कुणी जगण्यात इथे
जगतात कुणी जळण्यात इथे
नर नम्र तसेच सुशिक्षितही
पण खोट दिसे बघण्यात इथे
घडते नव जीवन रोज कुठे
अभिमान जुने जपण्यात इथे
भरघोस कुणा यश लाभतसे
जनता अवघी फसण्यात इथे
हरतात किती मरतात किती
यश मात्र खरे तगण्यात इथे
सरतील पुढे क्षण शेवटचे
सगळेच जुने स्मरण्यात इथे
- निलेश पंडित
५ जानेवारी २०१८
Super
उत्तर द्याहटवामनापासून आभार सुधाकर ___/\___
हटवा