हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ मे, २०१८

एक स्फुट

माझा फ्रिज माझ्या भुकेला सावली
माझी व्हिस्की माझं अमृत
माझा मॅकडोनाल्ड बर्गर महानैवेद्यच
माझी शेजारीण माझी पत्नीच
माझं आॅफिस माझं घरच
माझं घर माझं आॅफिस
माझा माॅल माझा आश्रमच
प्रत्येक सुपरमार्केट माझं मंदिर
माझ्या ग्राम्य शिव्या माझी उत्कट अभिव्यक्ती
... तल्लीन करणारा प्रत्येक ...
.... विशेषतः चार पेग नंतरच्या निद्रेआधीचा ...
उत्कट आवेगपूर्ण हिंस्त्र अल्पजीवी पण सुखकारक क्षण
म्हणजे ईश्वरचरणी लीनत्वातली समाधीच

नाही? वेडगळपणा वाटतो?
मग जिथे
कोट्यावधी जीव
उघड्यावर करतात मलविसर्जन
रात्रंदिवस रोगराई घालते थैमान
रक्तपात ठरतो दैनंदिन साधन
काही हरामखोरांमुळे
ज्यांना अव्याहतपणे वाढवायची असते
वासनालांच्छित क्रूर सत्ता संपत्ती

तिथे कशी ठरवावी
कुणीही गिळंकृत करावी, ओरबाडावी
खणावी, खोदावी, हडपावी - दडपावी
अशी निर्जीव जमीन
माता?

केवळ अडाणी भुकेलेल्यांनी
अंधारात मृत्यूच्या खाईची
वाट स्वेच्छेनं चालत जावं म्हणून?


- निलेश पंडित
२० मे २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा