हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १४ जून, २०१९

एक संवाद

हा: हाॅल कोणता ... कुठे?
तो: अखिलसेवासमाज ... शिकारी हौद
हा: छान सुशिक्षित उच्चभ्रू श्रोतृवृंद हवा
तो: हो ... शिवाय वीज, पाणी, केटरिंग, पार्किंग मुबलक
हा: गुड. साउंड सिस्टिम?
तो: उत्तम आहे. सगळीकडे आवाज पोहोचतो.
हा: प्रोजेक्टर मिळेल?
तो: हो ... लॅपटाॅप, रिमोटही आहेत आमचे हवे असतील तर.
हा: कदाचित् वापरेन मी ... मेनू शाकाहारी सर्वांना चालेल असा माइल्ड असू दे.
तो: नक्कीच ... केटरर्स आपल्याच समाजातले आहेत.
हा: छान. किमान दोन तास वेळ हवा दररोज.
तो: हो ... नक्कीच. तिकिटं पाठवू की रिएम्बर्समेंट चालेल?
हा: मीच काढतो. सुटेबल फ्लाइट्स हव्यात.
तो: अजुन काही सर?
हा: पत्रकार कोण कोण आहेत, प्रश्न काय ते आधी कळवा.
तो: जरूर. मॅडमही येणार आहेत?
हा: हो ... ती गाडी घेऊन शाॅपिंग करून येईल.
तो: ठीक. सत्कार समारंभ ...?
हा: छे ... छे ... नको. माझा ह्या दिखाऊ चोचल्यांवर आणि भपक्यावर विश्वास नाही.
तो: बरं. तुम्ही म्हणाल तसं. भेटूया.
हा: धन्यवाद. चांगला उपक्रम हाती घेतलाय तुमच्या मंडळानं. नेमके विषय काय सांगता? म्हणजे तशी तयारी चोख ठेवता येते.

तो: तीन पुष्पं सर ...
दिवस एक: पुष्प पहिलं: समता, सहिष्णुता, मनौदार्य व विचारस्वातंत्र्य
दिवस दोन: पुष्प दुसरं: अंतर्मनातील औदात्त्य आणि बांधिलकी
दिवस तीन: पुष्प तिसरं: सर्वसमावेशकता व साहित्यिकांचे अंत:स्थ अनुबंध

हा: छान
तो: आभारी आहोत सर. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करू व्याख्यानमाला!


- निलेश पंडित
१५ जून २०१९


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा