हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ७ जून, २०१९

विजयोन्माद


का असू नये
सार्थ विजयोन्माद

जेव्हा आकाशाला
गवसणी घालण्याच्या
महत्त्वाकांक्षेने सरसावून
पृथ्वीवर राहून
आम्ही पृथ्वीलाच केलं पादाक्रांत

वणवे, अग्नी
ठेवले आटोक्यात
हवं तेव्हा हवं तेवढंच
बेचिराख करून
जमिनी सपाट मोकळ्या करण्यासाठी

पृथ्वीचा पृष्ठभाग फोडून
कातळाची केली खडी - भुकटीही
पृथ्वीवर सहज वावरता यावं म्हणून

तशाच तयार केल्या लशी
जिवाणू वापरून
प्रतिरोध करण्यासाठी
त्याच जिवाणूंचा

आणि जन्माला घातली
जोपासली
वाढवली
नेमकी हवी तशी माणसं
योग्य तो वापर करून
झिजवून
संपवण्यासाठी ...
नेमकं नको त्या माणसांना

उत्क्रांती-प्रगतीसाठी
अखिल मानवजातीच्या!


- निलेश पंडित
७ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा