हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० जून, २०२०

लय


लखलखते झुंबर मोठे डोक्यावरती
उसळे झगमगती गर्दी अवतीभवती
... गुबगुबीत मोठा समोर सुंदर केक
अन् मदिरेच्या फैरींवर फैरी झडती

वावरती जे घालून खालती माना
लगबगीत अवघड करती कामे नाना
... त्यांनाही मिळतो केक शेवटी थोडा
यजमान मानती गरज असेही त्यांना

बाहेर बसे चिमणी कौलांवर एक
कणकणात मिळतो अल्प तिलाही केक
... तो केक एक पण वाटे बहुविध त्याचे
संघर्षातच आनंदाचा उद्रेक

नसतो तो केवळ वाढदिवस जोषात
क्षणक्षणात मृत्यूवर जगण्याची मात
... लय लयास जाण्यालाही सुरेख जडता
जगणेमरणेही जणू सूरतालात


- निलेश पंडित
२१ जून २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा