पोकळी
पुलाखालुनी वाहुन गेले
बरेच पाणी...बरेच पाणी...
माझ्या शिलकी मध्ये उरल्या
काही नोटा, काही नाणी
शिलकी मध्ये उरल्या जखमा
आणि अनामिक काही व्रणही
पिके लाभली उदंड जेव्हा
रुजून आले काही तणही
व्यथाहि नाही...खंतहि नाही
योग असे कि भोग मिळाले
कळले नाही परंतु तेव्हा
उदंड त्यांतच रोग मिळाले
रोग मिळाले नश्वरतेचे
व्यथा मिळाली, न्यून उरे ते
पदार्थ जाता उरुन पोकळी
कळली बाधा, मीपण येते....
जखमा, व्रण, नाणी अन् नोटा
अता भासती जणू निरर्थक
पोकळीत या अंतिम झाले
आयुष्याचे भरीव सार्थक
- निलेश पंडित
२१ नोव्हेंबर २०१०
पुलाखालुनी वाहुन गेले
बरेच पाणी...बरेच पाणी...
माझ्या शिलकी मध्ये उरल्या
काही नोटा, काही नाणी
शिलकी मध्ये उरल्या जखमा
आणि अनामिक काही व्रणही
पिके लाभली उदंड जेव्हा
रुजून आले काही तणही
व्यथाहि नाही...खंतहि नाही
योग असे कि भोग मिळाले
कळले नाही परंतु तेव्हा
उदंड त्यांतच रोग मिळाले
रोग मिळाले नश्वरतेचे
व्यथा मिळाली, न्यून उरे ते
पदार्थ जाता उरुन पोकळी
कळली बाधा, मीपण येते....
जखमा, व्रण, नाणी अन् नोटा
अता भासती जणू निरर्थक
पोकळीत या अंतिम झाले
आयुष्याचे भरीव सार्थक
- निलेश पंडित
२१ नोव्हेंबर २०१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा