कोपरा
आता गर्दी वाढत चालली..
...हवी होती हीच तर...!
आता भीती का वाटावी
का वाटावेत परके इतर?
अंधारातुन आलो तेव्हा
माहित होतच
मी उपरा
धडधडतं का छातीत जेव्हा
आता खुणवी...
माझा कोपरा?
आता फक्त स्मृतीत राहतील
ते सत्कार आणि हारतुरे
पश्चिमेच्या वाक्यात वाहतील
असंख्य पदं...
सारे चेहरे...
गर्दी वाढली
विस्तारली आता
चालली मात्र
दूर दूर...
आरामखुर्चीत विसावताना
डोळ्यांत
आठवणींचा पूर
सारे भास ही
आता धूसर
शब्द शब्द
होतो कापरा...
आयुष्याला
व्यापीत चालले
...आरामखुर्ची...
...अन् माझा कोपरा...
- निलेश पंडित
४ जून २०१२
आता गर्दी वाढत चालली..
...हवी होती हीच तर...!
आता भीती का वाटावी
का वाटावेत परके इतर?
अंधारातुन आलो तेव्हा
माहित होतच
मी उपरा
धडधडतं का छातीत जेव्हा
आता खुणवी...
माझा कोपरा?
आता फक्त स्मृतीत राहतील
ते सत्कार आणि हारतुरे
पश्चिमेच्या वाक्यात वाहतील
असंख्य पदं...
सारे चेहरे...
गर्दी वाढली
विस्तारली आता
चालली मात्र
दूर दूर...
आरामखुर्चीत विसावताना
डोळ्यांत
आठवणींचा पूर
सारे भास ही
आता धूसर
शब्द शब्द
होतो कापरा...
आयुष्याला
व्यापीत चालले
...आरामखुर्ची...
...अन् माझा कोपरा...
- निलेश पंडित
४ जून २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा