हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १२ जुलै, २०१२

भीती

विविध रूपांनी, रंग छटांनी येउन भेटे
भीती संतत मनात माझ्या घाली खेटे

घडीस जपण्या मला बांधते करडी भीती
बालपणीही छडीस बांधुन मज ठेवे ती

दंगलीत ती भडक तांबडी होउन येते
दुही माजवी...निष्पापांना तोडुन नेते

कृष्णवर्ण परिधान करोनी कधी ग्रासते
सुखनिद्रेतुनि जागविते...यम काल भासते

सफेद भीती पांढरपेशा इभ्रतीतली
सदैव टिकवे हसरी जिवणी ठेवणीतली

जडे सुखाला पारदर्शि होऊनच अंती
"असे अबाधित टिकेल का हे?" याची भीती

खरेच हे पण भीती देते जिवास अस्तर
किती वेदना टळल्या नसत्या ही नसती तर!

- निलेश पंडित
१२ जुलै २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा