कक्षा
ईर्षा होती...स्वप्ने होती...
आशा अन आकांक्षा होत्या
उमेद होती, ऊर्जा होती...
...होती...तारुण्यात तळपत्या
गेले ते...हे दिवस आले
चला हे ही बरे झाले
केस काळ्याचे पांढरे झाले
काही आशांचे खोबरे झाले!
स्वप्नाकडून सृष्टीकडे
वाट जसजशी वळली
तशी मनोमन मला - रक्ता...
...घामाची किंमत कळली
अंतर्मनातून सरत गेला
यश, किर्ती, पैशाचा पूर
भरड्या वसनी रेशीम जुळावे
तसे आले रंग, गंध, सूर
बरे झाले...भरधाव स्वप्ने...
वेगवान आशा मंदावल्या
जागा होत गेलो तशा
जगण्याच्या कक्षा रुंदावल्या
- २२ मे २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा