करुणाकरा
 
 तुझी निराळीच त-हा, ...रे...अगा करुणाकरा
 तूच रचिलेल्या जगी, मुग्ध तरि मी बावरा
 ...रे..अगा करुणाकरा !
 
 दिन दलितांचा तुला, म्हणति सारे व्यर्थ रे
 मालकांच्या हवाली, दिससि ज्या त्या मंदिरा
 ...रे..अगा करुणाकरा !
 
 तर्क प्रचितीच्या झळा, नेमका अन् दाखला,
 भार हे आम्हांवरी, तुज न हे विश्वंभरा
 ...रे..अगा करुणाकरा !
 
 व्यर्थ हाका मारुनी, घाम सारा गाळुनी
 देव त्यासच मानुनी, परततो माझ्या घरा
 ...रे..अगा करुणाकरा !
 
 - निलेश पंडित
 ५ जुन २०१२
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा