जय
 
 माझ्यासमोर आताशा
 भविष्याचा अभाव असतो
 वर्तमानात जगण्यावरही
 आठवणींचा प्रभाव असतो
 न्याहाळीत बसतो
 पुढे गेलेल्या
 सखीच्या पावलांचे ठसे
 सतत शांत...खिन्न मन
 मध्येच होते वेडे पिसे
 हात पाय मानच नव्हे
 मनही थरथर कापते
 व्याकूळ होऊन
 वयापासून
 मृत्यूचे अंतर मापते
 
 असो काही
 विश्रांती...आपत्ती..
 वेदनांचे भय आहे
 होईल थोडा त्रास पण.....
 .....अंती माझाच जय आहे
 .....अंती माझाच जय आहे
 
 - निलेश पंडित
 ४ नोव्हेंबर २००७
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा