"मी"त्व
भूप झाला, यमन झाला, कंसही किति गायिले
आळवू किति रागिण्या? ....गाणेच बाकी राहिले
लपविण्या मी व्यंग माझे, वस्त्र भारी लेइले
बोचरे परि मोह आतिल, अंतरातच राहिले
याचि देही, याचि डोळा, सौख्य सारे पाहिले
पक्वता परि राहिली...जगणेच बाकी राहिले
उघडले मी आज डोळे, अन् स्वताला पाहिले
अंतरातच गवसला तो, "मी"त्व त्याला वाहिले
- निलेश पंडित
७ मे २०१२
भूप झाला, यमन झाला, कंसही किति गायिले
आळवू किति रागिण्या? ....गाणेच बाकी राहिले
लपविण्या मी व्यंग माझे, वस्त्र भारी लेइले
बोचरे परि मोह आतिल, अंतरातच राहिले
याचि देही, याचि डोळा, सौख्य सारे पाहिले
पक्वता परि राहिली...जगणेच बाकी राहिले
उघडले मी आज डोळे, अन् स्वताला पाहिले
अंतरातच गवसला तो, "मी"त्व त्याला वाहिले
- निलेश पंडित
७ मे २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा