हा ब्लॉग शोधा

बुधवार, २५ जुलै, २०१२

स्तर

सुती कापडे
अंगावरती
घालुन आम्ही
वेगवेगळे
परंपरेचे
उदात्त ओंगळ
पदर सारखे
बघतो आहे

नग्न कारटी
रस्त्यावरची
कोण कोठली
झोपडीतली
दूरच ठेवुन
वस्त्र रेशमी
स्वप्नामध्ये
जपतो आहे
................
चिख्खल भरल्या
डबक्यां मधुनी
रस्त्यारस्त्या...
वरून आम्ही
धुवट चिरगुटे
इस्त्रीवाली
डबकी टाळत
घालुन फिरतो

शूभ्र भव्य अन्
संगमरवरी
महालातल्या
काळ्या धूसर
वलयांकित पण
रक्त पिपासू
यश कर्त्यांचे
पूजन करतो
................
निबर होउनी
अंग चोरुनी
आशा वेचुन
रोज रोजच्या
कृत्रिमतेच्या
तणावातल्या
सर्व क्षणांशी
लढून तगतो

दोन स्तरांच्या
मधील दाहक
कुंद पोकळी
मधून सारे
कुजकट बोथट
पण स्वप्नांनी
नटलेले हे
जीवन जगतो


- निलेश पंडित
२५ जुलै २०१२





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा