हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३ जुलै, २०१२

दिव्यापयश

दिव्यापयश

व्याख्याबद्ध यशात
गुंतत गेलो
"दिव्यापयश" ही कल्पना
कळलीच नाही
हृदयातील सुप्त धारिष्ट्याची
सूक्ष्म लाट
योग्य दिशेस
वळलीच नाही

मूकपणे पाहिले
दिनवाणे बळी
काळोख...भरदिवसा...
वेळी...अवेळी...
हृदयावर साचत गेली
धूळ निवळलीच नाही
"दिव्यापयश" ही कल्पना
कळलीच नाही

आता पळतो मीच दूर
राब राब राबून
माझ्या पासून
पांढरपेशा यश घेतो
रोख ठोक
कंबर कसून

क्षणभर परि एकांतात
अनावर अश्रू गळतात
बळी गेल्या अंधा-या दिशेस
भरले डोळे वळतात

- निलेश पंडित
८ मे २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा