हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३ जुलै, २०१२

उत्क्रांती

उत्क्रांती

गर्भितार्थ हे सार असावे
अव्यक्ताचा त्यात इशारा
त्रोटकतेच्या गूढ अंतरी
बोध लपावा विशाल...न्यारा...

लयीत चालो...वा ना चालो
शुद्ध असो वा अशुद्ध भाषा
कधी नटो आनंदे आणिक
कधी दर्शवो असाध्य क्लेशा

मनात व्हावी उत्क्रांती अन्
जन्मावी त्यातूनच कविता
पाश कशाचे बांधो...तोडो...
त्यांत असावी जीवनस
रिता

- निलेश पंडित
१५ मे २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा