निर्णय
 
 फार वर्षांपूर्वी गणपती बाप्पा दूध प्यायले
 पण आजही...
 मायक्रोवेव्ह मधील पाण्याने झाडं मरतात...
 कांद्याचे उरलेले तुकडे विषारी होतात...
 युनेस्को भारताचं राष्ट्रगीत सर्वोत्कृष्ट ठरवते...
 व्हायरस ची साथ  ज्ञानविध्वंस..संहार...करते...
 कुठलेसे तीन हिरे भारतास सर्वाधिक श्रीमंत करतात...
 Toilet  seat  खालील कोळी चावून अनेक माणसं मरतात...
 
 ...यांवर लोक विश्वास ठेवतात
 बातम्या घोंगावतात
 वादळं उठतात
 Emails  चे तर पहाड फुटतात
 
 अखेरीस...
 थोडी जाग येते
 विरळाच...
 पण कुठे संशोधनं होतात
 
 सोयीची चिकित्सा पडताच मागे
 तथाकथित चिकित्सकही बदलतात पवित्रा
 चिकित्सा आणि तर्काचा आणणारे आव
 आता म्हणतात..."योग्य...श्रद्धा आणि भाव""
 ...म्हणतात..."अयोग्य...चिकित्सा...संशोधनाचा प्रस्ताव"
 
 कोणतीतरी अदृश्य मरगळ
 तर्कानुमान मागे खेचते
 कमकुवत...सोपी भावना
 निराधार निर्णयास पोचते
 
 निलेश पंडित
 - १९ मे २०१२
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा